पत्नीच्या डोक्यात खोरे घालून पतीने केला खून
विट्यातील घटना, किरकोळ कारणावरून कृत्य, पतीला अटक
सांगली : खरा पंचनामा
भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून तिचा निर्घ्रुणपने खून केला. बुधवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान विटा येथील खानापूर नाका परिसरात घडली. याप्रकरणी विटा पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.
गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय ३०, सध्या रा. विटा, मूळ रा. याडहळ्ळी, ता. यादगीर, कर्नाटक) असे संशयित पतीचे नाव आहे. तर सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास आहे. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते रहात होते. बुधवारी रात्री विट्यातील हजारे मळा परिसरात भाड्याच्या घरात रहायला जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.
हळूहळू त्यांच्यातील वाद वाढत गेला. त्यानंतर चिडलेल्या गुराप्पा याने घरातील खोरे घेऊन पत्नी सलमाच्या डोक्यात वर्मी घाव घातले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो घराबाहेर जाऊन बसला. दरम्यान त्यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत विटा पोलिसांना कळवले होते. विटा पोलिस घटनास्थळावर पोहोचल्यानंतर संशयित गुराप्पा घराबाहेर रडत बसल्याचे दिसून आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्याला तातडीने अटक करण्यात आली. याप्रकरणी गुराप्पा इकुरोट्टी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक पूनम महाजन, महेश संकपाळ, व्ही. जी. येळेकर आदींनी पंचनामा कारवाईत भाग घेतला. महेश संकपाळ यांनी तक्रार दिली असून उपनिरीक्षक पूनम महाजन अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.