'आम्हाला ह्योच कलेक्शनवाला पायजे'!
सांगली : खरा पंचनामा
'सायेब, आम्हाला ह्योच कलेक्शनवाला पायजे' असा सूर आता 'आकडेवाले' आळवत आहेत. 'आकडेवाल्यां'ची तशी इच्छा आता संबंधित साहेब मनावर घेणार का, जर मनावर घेतले तर कुणाचे कलेक्शन जाणार याची चर्चा खात्यामध्ये जोर धरू लागली आहे. एकंदरीत कलेक्शन करणाऱ्यांनी मात्र आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.
गॅझेटनंतर खात्यामध्ये चांगलीच खांदेपालट झाली आहे. त्यामुळे अनेकांचे हक्काचे कलेक्शनचे मनसुबे उधळले गेले आहेत. तर काहींचे कलेक्शन गेल्यामुळे त्यांनी सुरुवातीला साहेबांकडे फिल्डिंग लावली पण अजूनही पदरात काही पडत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे जुन्या कलेक्शनवाल्यांनी आता नव्या शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे.
जिल्ह्यातील काही आकडेवाल्यांना हाताशी धरून आपली वर्णी कलेक्शनला लावून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आकडेवाल्यांनी काही बाही कारणे सांगून अमूक एकालाच कलेक्शन द्या असे निरोप संबंधित साहेबांकडे देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदा आकडेवाल्यांना तर होणार आहेच शिवाय संबंधित कलेक्शनवाल्याचीही चांदी होणार आहे म्हणूनच जिल्ह्यातून 'आम्हाला ह्योच कलेक्शनवाला पायजे'चे सूर ऐकू येऊ लागले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.