Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे ३४ कोटी कुणी खाल्ले? दानवेंनी उघड केला मोठा घोटाळा

नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे ३४ कोटी कुणी खाल्ले?
दानवेंनी उघड केला मोठा घोटाळा



मुंबई : खरा पंचनामा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबनातून सूट दिल्यानंतर शुक्रवारी ते विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले आहेत. सभागृहात जाण्यापूर्वी यांनी नागपूरमध्ये झालेल्या एका घोटाळ्याला वाचा फोडली.

अंबादास दानवे म्हणाले की, मी तीन दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा आलो आहे. काल एक घटना नागपूरची समोर आलीय. यामध्ये तब्बल १४ हजार शेतकऱ्यांचा सातबारा वापरला आणि नाव बदलून १४ हजार शेतकऱ्यांच्या नावावरील नुकसान भरपाई तलाठी आणि अधिकाऱ्यांनी लुबाडली. ही रक्कम ३४ कोटी रुपये असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

दानवे पुढे म्हणाले की, तलाठ्यापासून ते तहसीलदारांपर्यंत सगळेच या अपहारामध्ये सहभागी आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचं पाप केलं जात आहे. विशेष घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, असं दानवे म्हणाले.

स्वतःवरील कारवाईवरुन बोलताना दानवे म्हणाले की, माझ्यावर अन्याय केलेला आहे, विरोधी पक्षनेत्याविना सभागृह चालवणे चुकीचं आहे. मलाच जबाबदार धरलं गेलं आणि कारवाई केली. जसा पूल कोसळला तसं हे सरकार हे कोसळेल, जी काही विकासाची कामं सुरुयत, ती स्वतःला समृद्ध करण्यासाठी आहेत, असा आरोप त्यांनी सत्तापक्षावर ठेवला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.