लाडकी बहीण योजनेनंतर आता 'लाडकी म्हैस' योजना?
कोल्हापूर : खरा पंचनामा
महाविकास आघाडीत असतानाही आणि आता महायुतीत असतानाही जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढवणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
गोकुळ हा देशात आदर्श वाटावा असा दूध संघ आहे. कोणीही गोकुळवर टीका करू नये. गोकुळ विरोधकांनीही चालवलाच आणि आम्ही चालवत आहोत. विरोधकांसोबत आमदार सतेज पाटील आणि माझी दोन तीन मुद्यांवर लढाई होती. यामध्ये, आम्ही उत्पादकांना दोन रुपये दर देण्याची ग्वाही दिली होती, पण आम्ही प्रतिलिटर ११ रुपये भरघोस दर दिल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
'गोकुळ'च्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका वेगळ्या लढवल्या जातात. निवडणुकानंतर युती होते आणि सत्ता स्थापन केली जाते. महाविकास आघाडीतही अशीच निवडणूक लढवून एकत्र येत होतो. आताही त्याच पद्धतीने निवडणूक लढवली जाईल.'
महाराष्ट्रात गाय दुधालाच ठरवीक काळासाठी अनुदान मिळते. पाच राज्यांमध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्रातही म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही, असा सवाल पत्रकारांनी केला. यावर श्री मुश्रीफ यांनी आता लाडकी बहीण योजनेतून अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर म्हैस दुधाला अनुदान मिळण्यासाठी 'लाडकी म्हैस' योजना लवकरच सुरू होते का? पाहायला पाहिजे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.