Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल सांगली शहर, ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल
सांगली शहर, ग्रामीण पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने सांगली जिल्ह्यात थैमान घातले आहे. कृष्णा, वारणा नदी पात्रातून पाणी बाहेर पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी रात्री पाणी पातळी ३९.५ फुटांवर पोहोचली आहे. या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी चारजणांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कसबेडिग्रज ते मौजे डिग्रज मार्गावर पुराच्या पाण्यातून धोकादायकपणे दुचाकी नेल्याने एकावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याने एकूण ५ जणांविरोधात आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर धोकायदायकपणे सेल्फी घेत स्टंटबाजी केल्याप्रकरणी मौला मेहबूब नदाफ (वय २९, रा. शिवशंभू चौक, सांगली), बजरंग तुकाराम कुकडे (वय ३४, रा. जामवाडी, सांगली), मंथन दीपक मोटे (वय २१, रा. संजयनगर, सांगली), अजुर्न रामचंद्र पडळकर (वय १९, रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी मनाई करूनही कसबे डिग्रज ते मौजे डिग्रज दरम्यानच्या पुलावर विना क्रमांकाची दुचाकी नेल्याबद्दल आशिष राजाराम साळुंखे (रा. मौजे डिग्रज) याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    
 
सध्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी यांनी नदी काठी गर्दी करण्यास, पुराच्या पाण्यात उड्या मारण्यास, स्टंटबाजी करून सेल्फी काढण्यास, पुलावरून वाहत्या पाण्यातून दुचाकी नेण्यास मनाई आदेश काढला आहे. या पाचही जणांनी त्यांच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे, ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुनील कदम, रविंद्र वांगेकर, योगेश जाधव, आप्पासाहेब कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.