गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापुरात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कोल्हापुरातील कौलव गावातल्या एका घरामध्ये चार ते पाच फूटांचा खड्डा खणला असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये खणण्यात आलेल्या त्या खड्ड्याच्या बाजूला पानविडा, फुल आणि इतर काही गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. ही दृश्य मन विचलित करणारी असून, त्यामुळं संपूर्ण राज्यालाच आता हादरा बसला आहे.
राज्यामध्ये जादूटोणा कायदा लागू असतानाच दुसरीकडे कोल्हापुरात ही घटना घडली आहे. इथं घटनास्थळी घरामध्ये चार ते पाच फुटांच्या खड्ड्याशेजारी मोठमोठ्यानं मंत्रोच्चार करणारा, गळ्यात रुद्राक्षांची माळ असणारा साधू तिथं बसला होता. शेजारच्यांना हे मंत्रोच्चार ऐकून काहीतरी संशय आला आणि त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता देवघरात त्यांना खड्डा खणल्याचं आढळून आलं. ज्यानंतर चौकशी केली असता इथं गुप्तधन मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. प्रश्नांचा मारा केला असता इथं नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला असून, तातडीनं यंत्रणांना याची सूचना देण्यात आली.
6 जणांविरोधात सदर प्रकरणी जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, शरद माने असं प्रमुख आरोपीचं नाव सांगण्यात येत आहे. फिर्यादी शेजारील मंडळी असून, आता इथं नेमका कोणाचा नरबळी दिला जाणार होता यामध्ये आणखी कोणाचा हात होता याची चौकशी पोलिसांनी हाती घेतली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.