Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील दहा वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सेवेतील उपअधीक्षक दर्जाच्या ८ अधिकाऱ्यांचाही समावेश

राज्यातील दहा वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सेवेतील उपअधीक्षक दर्जाच्या ८ अधिकाऱ्यांचाही समावेश



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील दहा वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर राज्य सेवेतील पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या ८ अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. रंजन कुमार शमार् यांची पुण्याचे सह पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  
 
बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे बदली : सुनील रामानंद (अपर पोलिस महासंचालक, परिवहन विभाग पुणे ते अपर पोलिस महासंचालक नियोजन व समन्वय, मुंबई), प्रवीण साळुंके (अपर महासंचालक विशेष कृती, मुंबई ते अपर महासंचालक लोहमार्ग मुंबई), सुरेश मेखला (नियंत्रक वैधमापन ते अपर महासंचालक वाहतूक, मुंबई), दीपक पांडे (अपर महासंचालक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग ते अपर महासंचालक परिवहन विभाग, पुणे), अमिताभ गुप्ता (अपर महासंचालक कारागृह ते अपर महासंचालक विशेष कृती, मुंबई), सुहास वारके (पोलिस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था, मुंबई ते विशेष महानिरीक्षक महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई), अश्वती दोरजे (पोलिस सह आयुक्त नागपूर ते विशेष महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण मुंबई), छेरिंग दोरजे (पोलिस सह आयुक्त पुणे ते विशेष महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था, मुंबई), रजत कुमार शर्मा विशेष महानिरीक्षक सीआयडी पुणे ते सह आयुक्त पुणे शहर), डी. के. पाटील भुजबळ (विशेष महानिरीक्षक गुन्हे अभिलेख, पुणे ते विशेष महानिरीक्षक नागपूर). 

राज्य सेवेतील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात कोठून कोठे बदली : अनिल शेवाळे (अपर अधीक्षक सीआयडी नागपूर ते उपायुक्त एटीएस पुणे), धन्यकुमार गोडसे (उपअधीक्षक आर्थिक गुन्हे, नाशिक ते उपायुक्त पुणे), दादाहरी चौरे (उपायुक्त मुंबई ते उपअधीक्षक परतूर), विजय पाटील (उपअधीक्षक आर्थिक गुन्हे छत्रपती संभाजीनगर ते उपअधीक्षक पाटण), मनोहर पाटील (उपअधीक्षक यवतमाळ ते उपअधीक्षक जात पडताळणी, पालघर), सुधाकर सुराडकर (अपर अधीक्षक एसीबी मुंबई ते उपायुक्त नाशिक), उदगीरचे उपअधीक्षक सोहेल शेख, पाटणच्या उपअधीक्षक सविता गर्जे यांची बदली करण्यात आली असून त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.