दंगलस्थळी हजर राहणारा पोलिस अखेर निलंबित
नाशिक : खरा पंचनामा
बजरंगवाडी येथे झालेल्या दोन गटांतील दंगलीच्या वेळी घटनास्थळी हजर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास शहर पोलिसांनी निलंबित केले आहे. इरफान मन्सूर शेख असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे.
इरफान शेख हा आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होता. दंगलीच्या वेळी तो घटनास्थळी हजर असल्याचे तसेच संशयितांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात आढळून आले.
बजरंगवाडी परिसरात रविवारी (दि.१४) रात्री दोन गटांत दंगल उसळली होती. यात दोन्ही गटांतील संशयितांनी धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्यांचा वापर करीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला करीत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच तेथून जाणाऱ्या तिघांवरही हल्ला करीत त्यांच्याही वाहनाची तोडफोड केली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी तपास करीत दोन्ही गटांतील संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, दंगल करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यातील दोन्ही गटांमधील ८ संशयितांना आतापर्यंत अटक केली आहे. तसेच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता घटना घडली त्यावेळी तेथे आडगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदार इरफान शेख हादेखील घटनास्थळी हजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यास पोलिस कोठडीही देण्यात आली होती. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून, पोलिसांनी त्यास निलंबित केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.