Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा जोरदार राडा! कराडमधील मेळाव्यात माजी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याच्या लगावली श्रीमुखात

सांगलीच्या शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा जोरदार राडा!
कराडमधील मेळाव्यात माजी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याच्या लगावली श्रीमुखात



कराड : खरा पंचनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा विभागीय संपर्क नेते, आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड येथे झाला. त्या मेळाव्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली.

आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याला शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा, सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आज घेण्यात आला. या मेळाव्यासाठी पक्षाचे विभागीय संपर्क नेते आमदार जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांच्यात पक्ष वाढीच्या प्रश्नावरुन आणि अन्य कारणावरुन आमदार जाधव यांच्यासमोरच जोरदार वादावादी झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. शिवसेनेच्या सांगलीतील विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी संबंधितांची मनधरणी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.