Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसच पर्यटकांचे कपडे घेऊन पळाले! नेमका काय प्रकार?

पोलिसच पर्यटकांचे कपडे घेऊन पळाले!
नेमका काय प्रकार?



चिकमंगलूर : खरा पंचनामा

कर्नाटकमध्ये पोलिसांनीच पर्यटकांचे कपडे घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कै झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी पोलिसांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

लोकांनी पोलिसांनी घालून दिलेले नियम पाळावेत यासाठी कर्नाटक पोलिसांनी हटके उपाय केला आहे. पोलिसांच्या सूचनांचं पालन न करता पावसाळ्यामध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकून धबधब्यांखाली स्थानासाठी गेलेल्या पर्यटकांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. पर्यटक धबधब्याखाली अंघोळ करत असानाच अचानक तिथे पोलीस आले. सामान्यपणे पोलीस पर्यटकांना धबधब्यातून बाहेर काढून समज देतात. मात्र इथे उलटं घडलं. पोलीस आले आणि त्यांनी पर्यंटकांना काहीही बोलण्याऐवजी नदीच्या काठावर असलेले त्यांचे कपडे घेतले आणि निघून जाऊ लागले. यामुळे पर्यटकही संभ्रमात पडले. हा सारा प्रकार मुद्दीगीरी येथील चरमाडी धबधब्याजवळ घडला आहे. राज्य सरकारने पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाहचा अंदाज येत नसल्याचा संदर्भ देत धबधब्यांखाली अंघोळ करण्यावर बंदी घातली आहे.

राज्य सरकारने घातलेल्या बंदीचे आदेश झुगारुन काही पर्यटक धबधब्याखाली स्थानासाठी गेले. अंतर्वस्रांवर असलेल्या या पर्यटकांना पोलीस कपडे घेऊन जाऊ लागले असता तसेच बाहेर पडून पोलिसांचा पाठलाग करावा लागाला. हे पर्यटक कपडे घेऊन जाणाऱ्या चिकमंगळुरु पोलिसांकडे कपडे परत करण्याची विनंती करु लागले. मात्र पोलीस त्यांच्या गाडीमध्ये हे कपडे ठेऊन निघून जाण्याच्या तयारीत असताना पर्यटकांनी माफी मागत कपडे परत करण्याची विनंती केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.