Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑल आऊट ऑपरेशनमध्ये ६० गुन्हेगारांवर कारवाई १.४० लाखांचा दंड वसूल, संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांची मोहीम

ऑल आऊट ऑपरेशनमध्ये ६० गुन्हेगारांवर कारवाई
१.४० लाखांचा दंड वसूल, संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांची मोहीम



सांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरुवारी रात्री आल आऊट आपरेशन राबवण्यात आले. यावेळी विविध गुन्ह्यातील ६० जणांवर कारवाई करत ४ अवैध व्यवसायांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी हद्दपार केलेल्या दोघांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी केलेल्या नाकाबंदीत १५१ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत १.४० लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
गुरुवारी रात्री जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्री अकरा ते पहाटे तीन या काळात आल आऊट ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये आर्म एक्ट, पाहिजे व फरारी असलेले आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची, हद्दपार केलेल्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८ पाहिजे असलेले, ८ फरारी आरोपी, ४४ वारंटमधील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ४ अवैध व्यवसायांवरही कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील ८६ आरोपी तपासण्यात आले. तर २ हद्दपार आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी केलेल्या नाकाबंदीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १५१ वाहनांवर कारवाई करत १.४० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत जिल्ह्यातील ४२ पोलिस अधिकारी, २१९ पोलिस अंमलदारांनी भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.