Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयएएस अधिकारी सचिन कलंत्रे यांनी अमरावती महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला मावळते आयुक्त देवीदास पवार यांची सहआयुक्त पदावर पदोन्नती

आयएएस अधिकारी सचिन कलंत्रे यांनी अमरावती महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला 
मावळते आयुक्त देवीदास पवार यांची सहआयुक्त पदावर पदोन्नती



संभाजी पुरीगोसावी 
अमरावती : खरा पंचनामा

अकोला स्थिंत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक तथा आयएएस अधिकारी सचिन कलंत्रे यांनी अमरावती महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून पदाचा पदभार मावळते आयुक्त देविदास पवार यांच्याकडूंन स्वीकारला. तर मावळते आयुक्त देविदास पवार यांची सहआयुक्त पदावर पदोन्नतीने अमरावती जिल्ह्यातच नवी पदस्थापना देण्यात आली आहे. 

राज्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने 30 जून रोजी कलांत्रे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. विशेष म्हणजे कलंत्रे हे सुमारे दहा वर्षांपूर्वी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सचिन कलंत्रे यांच्या नियुक्तीमुळे अनेक वर्षांनी महापालिकेला आयएएस आयुक्त लाभला आहे. तर महापालिका आयुक्त देविदास पवार यांची अमरावती विभागीय आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून पदोन्नतीवर नवी पदस्थापना देण्यात आली आहे. 

नगरविकास विभागाने नव्या आयुक्तांचा सस्पेन्स कायम ठेवला होता. नगरविकास विभागाने 28 जून रोजी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील जवळपास 19 अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर बदली करताना केवळ मालेगांव, परभणी, जालना, लातूर येथील विद्यमान आयुक्तांना कार्यरत पदावरच पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे, सचिन कलंत्रे हे अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून देखील कार्यरत होते. त्यामुळे त्यांना अमरावती जिल्ह्याचा दांडगा अनुभव आहे.

नूतन आयुक्त सचिन कलंत्रे  यांनी मावळते आयुक्त देविदास पवार यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. यावेळी मावळत्या आयुक्तांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी आयुक्त कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.