उज्ज्वल निकम यांना खटला चालवण्यास हरकत
संशयित युवराज कामटेचे प्रधान न्यायाधिशांना पत्र
अनिकेत कोथळे खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी दारूण पराभव केला. आता हा पराभव उज्ज्वल निकम यांची पाठ सोडत नाहीये. सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने निकम यांच्या नियुक्तीबाबत हरकत घेतली आहे. कारागृहातून थेट जिल्हा व प्रधान न्यायाधिश पी. बी. जाधव यांना पत्र लिहीत कामटे याने हरकत घेतली आहे, अशी माहिती एड. विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली. कामटे याने मे महिन्यात हे पत्र लिहिले आहे.
सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला कामटे याने प्रधान न्यायाधिशांना पत्र लिहून हरकत घेतली आहे. उज्ज्वल निकम हे भाजपकडून निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार आणि अजेंडा बदललेला आहे. उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाचे उमेदवार राहिल्याने त्यांच्या युक्तीवादात तटस्थता असणार नाही. त्यामुळेच त्यांची कोथळे खून प्रकरणात पुन्हा केलेली विशेष सरकारी वकील पदाच्या नियुक्तीला हरकत असल्याचे कामटे याने पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती कामटेचे वकील एड. विकास पाटील-शिरगावकर यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली आहे.
युवराज कामटे सांगली शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे आणि त्याच्या मित्राला अटक केली होती. यावेळी कामटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या थर्ड डिग्रीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने अन्य संशयितांच्या मदतीने आंबोली येथे त्याचा मृतदेह नेऊन त्याची विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी कामटेसह अन्य पोलिसांवर गुन्हा दाखल असून त्याबाबत सांगली जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरच आता कामटे याने हरकत घेतली आहे. दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.