Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एक तर तू राहशील नाहीतर मी राहील' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

'एक तर तू राहशील नाहीतर मी राहील' 
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा



मुंबई : खरा पंचनामा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शाखा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आदित्यला तुरुगात टाकण्यासाठी फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. ठाकरेंच्या या आरपारच्या भूमिकेने आगामी काळात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, " लोकसभा निवडणुकीत आपण असं लढलो की मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषणे ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो. थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं ते सगळं मी केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी राहणार नाही. यांनी आपले कुटुंब आणि पक्ष फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत.

शिवसेना ही गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपणाला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपणाला मुळासकट उपटून टाकायची आहे", असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की, माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत.

अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुगात टाकण्यासाठी या फडणवीसांचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर या सगळ्यांना आव्हान देत आहे.

मी म्हणजे मी नाही, तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे. पण आगामी दिवसांमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार करा. लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे", असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.