Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा नव्या नियमांनुसार पोलिसांनी 'अशी' केली FIR

नव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा
नव्या नियमांनुसार पोलिसांनी 'अशी' केली FIR



दिल्ली : खरा पंचनामा

देशभरात आजपासून नवा कायदा लागू झाला आहे. ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झालाय.

आता या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. कुठे नोंद झालाय हा गुन्हा आणि कशाप्रकारे लिहिली गेलीय FIR? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नव्या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हा दिल्लीच्या कमला मार्केट येथील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. तिथल्या पोलीस सब इन्स्पेक्टरने स्वतः आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.

दाखल करण्यात आलेल्या एफआयरनुसार एसआय कार्तिक मीणा यांनी हा गुन्हा दाखल केलाय. सब इन्स्पेक्टर कार्तिक हे नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनजवळील फूटपाथजवळ पेट्रोलिंग करत असताना डीलक्स शौचालयाजवळ पोहोचले. येथे एक इसम सार्वजनिक रस्त्यावर ठाण मांडून बसला आणि विडी, सिगारेट, पाणी, पोहोचवत होता. यामुळे येथून येजा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता.

हे पाहून एसआय कार्तिक यांनी त्या इसमाला हटकले. रस्त्यातून स्टॉल बाजूला करण्यास सांगितले. पण आपण हतबल आहोत. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीय, असे म्हणून स्टॉल मालक तिथून निघून गेला. यानंतर इन्स्पेक्टर यांनी स्टॉल धारकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आता एफआयआर नव्या पद्धतीने लिहिली जाणार आहे. नवीन कायद्यानुसार ती बीएनएस अंतर्गत लिहावी लागेल. नव्या कायद्यानुसार दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरची प्रत समोर आलीय.

भारतीय न्याय संहिताच्या कलमाअंतर्गत रात्री 12 वाजल्यानंतर सर्व प्रकरणातील एफआयआर दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच सीआरपीसीऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच बीएनएसच्या कलम 173 अंतर्गत घेतली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.