IAS पूजा खेडकर यांच्यावर दुसरी मोठी कारवाई; UPSC कडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. आता आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.