Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चमकोगिरी करणाऱ्या IAS ला सरकारनं दाखवला इंगा! ऑडीला लाल-निळा दिवा अन् अधिकाऱ्याचं कार्यालय होत बळकावलं

चमकोगिरी करणाऱ्या IAS ला सरकारनं दाखवला इंगा!
ऑडीला लाल-निळा दिवा अन् अधिकाऱ्याचं कार्यालय होत बळकावलं



पुणे : खरा पंचनामा

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झालेल्या 'प्रोबेशन' कालावधीत महिला 'आयएएस' अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसवून आपल्या 'व्हीआयपी' नंबर असलेल्या खासगी 'ऑडी' गाडीला त्यांनी लाल-निळा दिवा लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

ही महिला अधिकारी एवढ्यावर थांबली नाही तर एका अधिकाऱ्याच्या 'अॅण्टी चेंबर'मध्ये आपले आलिशान कार्यालय थाटले. तिथे आपल्या नावाची पाटीदेखील लावली. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा त्यांचाच रूबाब भारी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पुण्यातील रूबाबात चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकर यांची राज्य सरकारने थेट वाशिमला बदली केली आहे.

'आयएएस'पदी निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना दोन वर्षे शिकण्यासाठी विविध पदांवर सहा महिन्यांसाठी 'प्रोबेशन'री नियुक्ती केली जाते. 'प्रोबेशन'री अधिकाऱ्यांसाठी वाहन सुविधा अथवा त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात येत नाही. असे असताना देखील या अधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'अॅण्टी चेंबर'मध्ये स्वतःचे कार्यालय थाटले. तसेच, त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची पाटी देखील ही लावली होती.

असे आरोप समोर आलेल्या नंतर पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.

खेडेकर या 2023 बॅचच्या 'आयएएस' अधिकारी आहेत. जून 2023 पासून त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी नियुक्तीपासूनच अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अहमदनगरमधील पाथर्डी येथील असलेल्या पूजा खेडकर या माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.

दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिणमधून 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर या देखील भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.