Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; विधानसभेतील VIDEO व्हायरल

भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; विधानसभेतील VIDEO व्हायरल



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरु आहे. त्यातच आज विधानपरिषदेची निवडणूक सुरु असल्याने सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान सभागृहातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत.

व्हिडीओत दिसत आहे की, भाजपा आमदार राजेश पवार सभागृहात बोलत आहेत. यावेळी मेघना बोर्डीकर मागील बाकावर बसलेल्या आहेत. यावेळी त्या एका फाईलवर स्वाक्षरी करतात. स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील दोन नोटा फाईलमध्ये ठेवतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.