राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई : खरा पंचनामा
राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांचा देखील समावेश आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघंही लोकसभेवर निवडून गेल्यानं राज्यात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत या जागांवर देखील निवडणूक घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या एकूण बारा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. 14 ते 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 26 ऑगस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत आहे. तर 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघंही लोकसभेवर निवडून गेल्यानं दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी देखील निवडणूक होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.