Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रात्रीत 13 पोलिसांची घरे फोडणार सापडला चोराचा खबरी कोण? पोलिसांसमोर आव्हान

रात्रीत 13 पोलिसांची घरे फोडणार सापडला
चोराचा खबरी कोण? पोलिसांसमोर आव्हान



मुंबई : खरा पंचनामा

माहीममध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव कमरुद्दीन शेख (वय 40) आहे. माहीम पोलीस कॉलनीतील एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. 20 ऑगस्टच्या मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून आरोपीला पोलीस कॉलनीतील माहिती कोणी दिली याचा तपास सुरू आहे. मध्यरात्री दबक्या पावलाने माहीम पोलीस वसाहतीत येत पोलिसांची घर बंद असल्याची खात्री करून ही घरफोडी करण्यात आली. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरीस गेल्या होत्या. पोलिसांच्या घरांसह प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयातही चोरट्याने हात साफ केले. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घरे तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना टार्गेट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331 (4), 324 (4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी तक्रारदार राजाराम मोहिते हे पाणी सोडण्याचे काम करत असून पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत का याची पाहणी करून घरी परतत असताना त्यांना आपल्या वसाहतीत चोरी झाली आहे, अशी माहिती मिळाली. पोलीसांच्या बंद घरांची माहिती या चोरट्याला कशी लागली, या गोष्टीचा उलगडा होणे गरजेचे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.