Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जालन्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे आलेल्या 22 तलवारी हस्तगत दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

जालन्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे  आलेल्या 22 तलवारी हस्तगत
दोन आरोपींना अटक;  स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी



संभाजी पुरीगोसावी 
जालना : खरा पंचनामा

जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे विनापरवाना शस्त्रे यासारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी  यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे नूतन वरिष्ठ निरीक्षक पंकज जाधव यांनी वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती शोध घेत असताना खबऱ्यामार्फत दोन्ही इसमानी जिल्ह्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे तलवारी मागवलेल्या होत्या. 

सदर  डिलिव्हरीसाठी दोघेजन येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी आदित्य राजू काटकर व मंगेश राजू काटकर यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या कब्जांतून सुमारे एकूण 22 तलवारी 44000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जाधव स.पो.नि. योगेश उबाळे स.पो.नि. शांतीलाल चव्हाण पो. उपनि राजेंद्र वाघ, संजय राऊत, भाऊराव गायके, रमेश राठोड, विजय डिक्कर, रुस्तुम जैवाळ, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, संभाजी तनपुरे, देविदास भोजने यांच्यासह  आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.