तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी मागितली 5 लाखांची लाच; एपीआयवर गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३२ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार करणारा अर्ज लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल होता. त्याचा तपास वाघोली पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले याच्याकडे होता. या तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी चेतन थोरबोले याने ५ लाख रुपयांची लाच मागितली.
अगोदरच या तक्रार अर्जामुळे नोकरी गेली असताना आणखी ५ लाख रुपयांची लाच मागत असल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची १, ४, ११ व २४ जुलै रोजी पडताळणी केली. या पडताळणीवेळी थोरबोले याने तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. परंतु, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर बुधवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.