दुचाकीची किंमत 50 हजार... दंड सव्वा लाख!
पुणे : खरा पंचनामा
नेहमीच पुणेकर वेगवेगळ्या बाबींमध्ये अग्रेसर असतात, मग वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्येही पुणेकर कुठे मागे कसे राहणार? पुणे वाहतूक विभागानं जाहीर केलेली बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची आकडेवारी चकित करणारी आहे. MH 12 LX 4371 ही आहे पुण्यातील विक्रमवीर दुचाकी, या दुचाकीला 157 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचा मान मिळालाय. दुचाकीची किंमत आहे 50 हजार आणि तिच्यावर दंड ठोठावण्यात आलाय एक लाख 21 हजार रुपये..
पुण्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आणि धक्काच बसला.. यामध्ये प्रत्येकी एका वाहनाकडून 130 आणि 116 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. 21 वाहनांनी 100 पेक्षा जास्त वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. तर 988 वाहनांनी 50 पेक्षा अधिक वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं आकडेवारीतून उघड झालंय. वाहतूक नियमांची ऐशी तैशी करणाऱ्या वाहनांवर मागील 5 वर्षांत तब्बत 373 कोटींचा दंड प्रलंबित आहे.
वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, नो एंट्रीमध्ये गाडी टाकणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे अशा विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांना धुडकावलं जातं. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.