महिला पोलीस शिपायाची नदीत उडी मारून आत्महत्या
पिंपरी : खरा पंचनामा
आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारून महिला पोलिसांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.
आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.