कानाच्या ऑपरेशनसाठी दिलेली भूल जीवघेणी ठरली.. महिला पोलिसाचा मृत्यू!
मुंबई : खरा पंचनामा
घटना मुंबईमधील अंधेरी पश्चिम भागातील असून या घटनेमध्ये कानाचे ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात दाखल झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू भुलीचे इंजेक्शन दिल्यामुळे झाला असल्याचा दावा केला जात आहे.
गौरी सुभाष पाटील या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स शेजारच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गौरी पाटील यांना कानाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्या ऑपरेशनसाठी या दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. त्यांना जेव्हा भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा मृत्यू हा भुलीचा इंजेक्शनमुळे झाला असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटने संदर्भात पुढील तपास सुरू आहे. दरम्यान रुग्णालयाच्या वतीने मात्र या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.