Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुकलीची हत्या अत्याचार झाल्याचा संशय

कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुकलीची हत्या
अत्याचार झाल्याचा संशय



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निघृण हत्या प्रकरण देशात सर्वत्र गाजत असताना त्यानंतर महाराष्ट्र हादरला तो बदलापूर प्रकरणाने. बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची भयंकर घटना उघडकीस आली होती.

त्यानंतर राज्यात वातावरण खूप तापले होते. हे प्रकरण ताज असताना आता कोल्हापुरातही असाच प्रकार उघकीस आला आहे. कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धकादायक बातमी उघडकीस आली आहे. दरम्यान तिच्यावर अत्याचार झालेत का हे वैद्यकीय चाचणीनंतर समजेल असे सूत्रानी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी काल (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.