Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अविनाश बारगळ बीडचे पोलिस अधीक्षक, दिगंबर प्रधान मुंबईचे उपायुक्त

राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अविनाश बारगळ बीडचे पोलिस अधीक्षक, दिगंबर प्रधान मुंबईचे उपायुक्त 



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बुधवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. अमरावती सीआयडीचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अधीक्षक दिगंबर प्रधान यांची मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
ठाणे शहरचे वाहतूकचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांची छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) चे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरचे उपायुक्त विजय मगर यांची लातूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महामार्ग सुरक्षा पथक ठाण्याचे अधीक्षक मोहन दहिकर यांची ठाणे शहरचे उपायुक्त तर मुंबईतील उपायुक्त प्रकाश जाधव यांची नियोजन व समन्वय, मुंबईचे सहायक पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

नांदेड एसीबीचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे शहरचे पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरचे उपायुक्त गोरख भामरे यांची गोंदियाचे पोलिस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. हिंगोलीचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची पुणे शहरच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर राज्य राखीव पोलिस बल गट ४ चे समादेशक प्रियांका नारनवरे यांची नागपूर लोहमार्गच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. गोंदियाचे अधीक्षक निखिल पिंगळे यांची पुणे शहरच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.