चंद्रकांत पाटील यांचा गुंड गजा मारणेकडून सत्कार, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे : खरा पंचनामा
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटील यांचा सत्कार कुख्यात गुंड गजा मारणे यांच्याकडून होताना दिसत आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात आयोजित एका दही हंडी कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. पष्पगुच्छ देऊन गजा मारणे यांनी चंद्रकांत पाटील यांना सन्मानित केले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा जोरात सुरू आहे आणि विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे.
या घटनेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, विशेषतः त्यांच्या आगामी निवडणूक तयारीवर याचा परिणाम होऊ शकतो. गजा मारणे यांच्यासोबतच्या या सत्कारामुळे त्यांच्या विरोधकांना एक नवीन मुद्दा मिळाला आहे, जो आगामी काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या घटनेवरून चर्चेला उधाण आले असून, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.