Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आकिवाट-बस्तवाड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून दोघेजण बेपत्ता सरपंच पतीचा मृत्यू, सहाजण बचावले, शिरोळ तालुक्यावर शोककळा

आकिवाट-बस्तवाड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून दोघेजण बेपत्ता
सरपंच पतीचा मृत्यू, सहाजण बचावले, शिरोळ तालुक्यावर शोककळा



शिरोळ : खरा पंचनामा


पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॅलीमधील दोघेजण बुडाले असून आकिवाटच्या सरपंचाचे पतीचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर यातील सहाजण बचावले आहेत. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आकिवाट बस्तवाड रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुरात ट्रॅक्टर उलटल्याने शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बचावलेल्यांवर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर बेपत्ता लोकांचा एनडीआरएफचे पथक शोध घेत आहे.  
 
यामध्ये सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर रोहिदास माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रेणीक चौगुले, अरूण कोथळे, सागर माने, अण्णासाहेब हसुरे हे बचावले आहेत. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार बेपत्ता झाले आहेत. गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठजण ट्रॅक्टर ट्रॉलीमधून नदीच्या पुरातून जात होते. त्यावेळी पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ट्रॉली उलटली. त्यानंतर महापुराच्या पाण्यात आठहीजण वाहून गेले. त्यातील सरपंच पती सुहास पाटील, रोहिदास माने पोहत आकिवाट येथे आले. त्यांना जोराची धाप लागल्याने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सुहास पाटील यांचा मृत्यू झाला.  

श्रेणीक चौगुले, अरूण कोथळे, सागर माने यांनी पोहत बस्तवाडकडील नदीकाठ गाठला. तर इकबाल बैरागदार, अण्णासाहेब हसुरे राजापूर बंधाऱ्याच्या दिशेने वाहत गेले. त्यातील हसुरे यांना बचाव पथकाने वाचवले मात्र बैरागदार बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार अनिलकुमार हेळकर, कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, नायब तहसिलदार योगेश जमदाडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, ग्राम विकास अधिकारी नंदकुमार निर्मले घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.