Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ११ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लक्ष्मीकांत पाटील मुंबई सायबर सेलचे अधीक्षक, वैशाली कडूकर साताऱ्याच्या अतिरिक्त अधीक्षक

राज्यातील ११ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
लक्ष्मीकांत पाटील मुंबई सायबर सेलचे अधीक्षक, वैशाली कडूकर साताऱ्याच्या अतिरिक्त अधीक्षक 



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील ११ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने मंगळवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. पीटीसी नागपूरचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांची मुंबई शहर सायबर सेलचे अधीक्षक पदी, सोलापूर पीटीसीच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांची साताऱ्याच्या अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  
 
पालघरचे अतिरिक्त अधीक्षक पंकज शिरसाट यांची ठाणे शहरचे उपायुक्तपदी, रायगडचे अतिरिक्त अधीक्षक अतुल झेंडे यांची ठाणे शहरचे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ठाणे शहरच्या उपायुक्त रूपाली खैरमोडे यांची ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक विनायक नरळे यांची पालघरचे अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे सहायक महानिरीक्षक अभिजित शिवथरे यांची रायगडे अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

नागपूर एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूरचे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नागपूरचे उपायुक्त विजयकांत सागर यांची मुंबईचे उपायुक्तपदी, ठाणे ग्रामीणच्या अतिरिक्त अधीक्षक दीपाली घाटे यांची मुंबईच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, जमाती आयोगाचे अधीक्षक सूरज गुरव यांची नांदेडचे अतिरिक्त अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.