कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
विविध उपक्रमांचे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरानी दिल्या शुभेच्छा
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे कर्मवीर भाऊराव पत संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले. विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम, सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, भाजपाचे नेते शेखर इनामदार, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, समडोळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, इनाम धामणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, ज्येष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर सारडा, सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार, प्राचार्य डी. डी. चौगुले, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेवक राजेश नाईक, माजी नगरसेवक आयुब पठाण, रविंद्र वळवडे, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, डॉ. अजित पाटील, डी. ए. पाटील, रविंद्र पाटील, अभय पाटील, एस. आर. पाटील, आर. एस. चोपडे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात, महाराष्ट्राचे पतसंस्था फेडरेशनचे शशिकांत राजोबा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रविंद्र मानगावे, उद्योजक सुदर्शन हेरले, विनोद पाटोळे, राहुल सकळे नांद्रे, सारस्वत बँकेचे सांगली येथील वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. आशुतोष चोपडे, जिव्हाळा ग्रुप सांगलीचे सर्व मान्यवर सदस्य, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक सकळे, संचालक एस पी मगदूम, डॉ. रमेश ढबू, वसंतराव नवले, ए. के. चौगुले, लालासो थोटे, नरेंद्र खाडे तसेच जनरल मॅनेजर अनिल मगदूम आणि विविध शाखांचे सल्लागार संचालक पदाधिकारी कर्मचारी वर्ग आणि सदस्य उपस्थित होते.
रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळी तालुका शिरोळ येथील ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबवले होते. कोथळी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोथळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आष्टा पीपल्स बँकेचे दिलीप वग्यानी, पंचगंगा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन धनगोंडा पाटील, जीवन पाटील, अरुण पाटील, कोथळी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच संजय खवाटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावसाहेब पाटील यांनी आमदार व्हावे : यड्रावकर
यावेळी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी "रावसाहेब पाटील यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक आर्थिक सहकार क्षेत्रात प्रचंड काम केले. त्यांनी आता राजकीय क्षेत्रात ही काम करावे व लवकर आमदार व्हावे. त्यासाठी सर्व सहकार्य करू" असे सांगितले.
दक्षिण भारत जैन सभा, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली, शेठ रा.ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, वीराचार्य पतसंस्था सांगली इत्यादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. केमिस्ट संघटनेतील विविध पदाधिकारी आणि केमिस्ट यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. तिर्थकर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याशिवाय सांगली व सांगलीच्या पंचक्रोशीतील विविध गावातील मान्यवर नेते मंडळी आणि प्रतिष्ठित मान्यवर तसेच त्यांचे गाव ब्रम्हनाळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आप्तेष्ट, परिवार, मित्रपरिवार इत्यादींनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याशिवाय अनेक मान्यवरांनी त्यांना फोनवरूनही शुभेच्छा दिल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.