महाराष्ट्र बंद विरोधात सदावर्तेची याचिका, हायकोर्टाची याचिकाकर्त्यांनाच तंबी
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. २४ ऑगस्टला पुकारलेल्या महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांनी याचिका दाखल केली होती.
महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आलाय. या बंदमुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय, यांच्यासह सर्वसामान्य जनता भरडली जाणार असल्याचा आरोप केला आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.
उच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ यांनी स्पष्टीकरण दिलं असून कुणालाही अशा प्रकारचा बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलंय. २४ ऑगस्टचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून बंद करणाऱ्या आंदोलकांवर कायद्याने कारवाई केली जाईल असंही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेत तर आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असेल तर आम्हाला यात का खेचताय असंही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी याचिकाकर्त्यांना विचारलं. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच तंबी देत याचिकेत राजकीय आरोप करू नका असं म्हटलंय.
उच्च न्यायालायने म्हटलं की, याचिकेवर आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी सुनावणी घेऊ. आज दुपारपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली असून अडीच वाजता पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.