राज्य उत्पादन शुल्कच्या ७ अधीक्षकांच्या बदल्या
रविंद्र आवळे सातारचे तर स्नेहलता नरवणे कोल्हापूरच्या अधीक्षक
मुंबई : खरा पंचनामा
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या ७ अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे यांची साताऱ्याच्या अधीक्षकपदी तर चर्मोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापक (प्रतिनियुक्ती) स्नेहलता नरवणे यांची कोल्हापूरच्या अधीक्षकपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
ठाण्याचे अधीक्षक निलेश सांगडे यांची मुंबई शहरच्य अधीक्षकपदी, सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरच्या अधीक्षकपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. जालन्याचे अधीक्षक पराग नवलकर यांची बुलढाणाच्या अधीक्षकपदी तर बुलढाण्याच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांची सोलापूरच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. मुंबई शहरचे अधीक्षक प्रविण तांबे यांची ठाण्याच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.