Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हरिपूरात चाळीस तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला; दोन लाखांची रोकडही लंपास दोन बंगले, मंदिर फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

हरिपूरात चाळीस तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला; दोन लाखांची रोकडही लंपास
दोन बंगले, मंदिर फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद



सांगली : खरा पंचनामा


मिरज तालुक्यातील हरिपूर येथील दोन बंगले चोरट्यांनी फोडले. यामध्ये चाळीस तोळे सोन्यासह दोन लाखांची रोकड लंपास केली. सुमारे तीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यासोबत परिसरातील दोन मंदिरातही चोरीचा प्रयत्न झाला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रशांत प्रदीपकुमर अडसुळ (रा. सुमंगल पार्क, हरिपूर ) यांनी फिर्याद दिली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत. अडसूळ यांचा सुमंगल पार्क येथे पॅराडाईज नावाचा बंगला आहे. ते खासगी कंपनित नोकरी करतात. त्यांचे वडील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. वडील प्रदीपकुमार काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

काल ते व आई दोघेही बंगल्यास कुलुप लावून रात्री रुग्णालयात गेले होते. मध्यरात्री दोन ते तीन चोरट्यांनी अडसुळे यांचा बंगल्याच्या दरवाज्याची कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. आतील लोखंडी कपाटातील ४० तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख २ लाख रुपये घेवून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील आणखी एक बंगला फोडला. तेथून सोन्याची अंगठी लंपास केली.

दोन बंगले फोडल्यानंतर चोरट्यांनी गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिराकडे गेले. येथेही चोरीचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. तेथून चोरटे पसार झाले. सकाळी नऊ वाजता अडसूळ घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना कळवले. पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरिक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देवून परिसराची पाहणी केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. 

या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सराईत चोरट्यांकडून ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांसह एलसीबीची पथके विविध भागात तत्काळ रवाना करण्यात आली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.