विधानसभा निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील चार महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. यामध्ये आगामी काळात महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुका एक महिना पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असे माध्यमांना सांगितले आहे.
या निवडणुकांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही तयारी निवडणूक आयोग करत आहे. तसेच या राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादी सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदार यादी अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या शिव स्वराज्य यात्रेविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आम्ही यात्रेला सुरूवात करणार आहोत. तसेच हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी शिव स्वराज यात्रेचा एक लोगो देखील सादर केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.