"राज ठाकरेंना सुपारीबाज" म्हणत मराठ्यांनी भिरकावल्या सुपाऱ्या
बीड : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले होते. यावेळी मराठा आंदोलक आणि शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवत सुपारी फेकून आंदोलन केले आहे. त्याचसोबत ताफ्यासमोर 'सुपारीबाज' आणि 'चले जाव'च्या घोषणा दिल्या आहेत. या घोषनेनंतर मराठा आंदोलक, शिवसैनिक आणि मनसेत तुफान राडा झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली होती.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेनंतर राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंना धाराशीवमध्ये देखील मराठा आंदोलकांनी घेरलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले होते. यावेळी बीडमध्ये पोहोचताच राज ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलक आणि शिवसैनिक यांनी अडवला होता. यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी फेकून निषेध नोंदवण्यात आला होता. त्याचसोबत ताफ्यासमोर 'सुपारीबाज' आणि 'चले जाव'च्या घोषणा दिल्या आहेत. या घोषनेनंतर मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यात तुफान राडा झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरूवात केली होती.
राज ठाकरे यांना आता मराठा आंदोलकांनी विरोध करायला सुरूवात केली आहे. आज बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा पोहोचताच मराठा आंदोलकांना आक्रमक पावित्रा घेत त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या भिरकावल्या होत्या. यावेळी मराठा आंदोलकांसोबत ठाकरेची शिवसैनिक देखील होते. तसेच ताफा अडवून मराठा आंदोलकांनी सुपारीबाज, चलेजावच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे आता बीडमध्ये देखील राज ठाकरेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोर जावे लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.