Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर करणार कारवाई पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा ईशारा

पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर करणार कारवाई 
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा ईशारा



संभाजी पुरीगोसावी
मुंबई : खरा पंचनामा


एकीकडे पदोन्नती मिळत नाही म्हणून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना माहिनोमहिने प्रतीक्षा करावी लागते. तर दुसरीकडे पदोन्नती मिळूनही ती नाकारण्याचे कारण न देता पदोन्नती नाकारणाऱ्या चार पोलीस निरीक्षकांना साईड ब्रँचमध्ये (अकार्यकारी पदावर) बसविण्याचा निर्णय राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला आहे. मात्र पदोन्नती नाकारणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलीस महासंचालकांनी उगारला आहे. 

यामध्ये पुणे युनिट मधील नितीन जाधव, सुदाम पाचोकर आणि जळगांव युनिटमधील सुहास देशमुख व मुंबई युनिटमधील मनीष झेंडे यांच्यावर पदोन्नती नाकारल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देवुन पोलीस उपअधीक्षक बनवले गेले आहे. मात्र त्यातील काही पोलीस निरीक्षकांना वर कमाईचे पोस्टिंग सोडण्याची इच्छा नसल्याने ते पदोन्नतीवर जाण्यांस तयार नसल्याची कुणकुण पोलीस महासंचालकांना लागली होती. त्यामुळे त्यांनी पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देण्याचा इशारा दिला होता. पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या जवळपास 35 ते 40 च्या घरात दिसून येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.