Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ७ पोलिस उपअधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना सांगलीचे अण्णासाहेब जाधव यांची नाशिक नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षकपदी बदली

राज्यातील ७ पोलिस उपअधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना
सांगलीचे अण्णासाहेब जाधव यांची नाशिक नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षकपदी बदली



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील सात पोलिस उपअधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचीही पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यांची नाशिक येथील नागरी हक्क संरक्षणच्या अधीक्षकपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. 

नरसिंग यादव यांची महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण, मुंबईच्या नियंत्रकपदी, सोमनाथ वाघचौरे यांची राज्य राखीव पोलिस बल दौंड, ५ चे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे. निलेश पांडे यांची अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. प्रशांत अमृतकर यांची कोल्हापूर येथील राज्य राखीव बल १६ च्या समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदाशिव वाघमारे यांची नागरी हक्क संरक्षण, नागपूरचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. निलेश सोनावणे यांची बिनतारी सागरी विभाग मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.