Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑनलाइन रमी अॅप्समुळे तरुणवर्गाचे नुकसान; बंदीसाठी जनहित याचिका दाखल

ऑनलाइन रमी अॅप्समुळे तरुणवर्गाचे नुकसान; बंदीसाठी जनहित याचिका दाखल



मुंबई : खरा पंचनामा

जंगली रमी आणि रमी सर्कल या जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या अॅप्समुळे सामाजिक (विशेषतः तरुण वर्गाचे) नुकसान होत आहे. त्यामुळे त्यावर राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते गणेश राणू ननावरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

याचिकेनुसार, ननावरे यांनी आधी राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध सरकारी कार्यालयांना निवेदन पाठवून जंगली रमी आणि रमी सर्कल अॅप्सवर बंदी घालण्याची विनंती केली होती. परंतु त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

या अॅप्सच्या जाहिराती सेलिब्रिटी मंडळी करीत आहेत. त्यामुळे त्यांना अधिक लोकप्रियता मिळते, मात्र या प्रकारामुळे सामाजिक नुकसान होत आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

दोन्ही अॅप्स कायद्याचे उल्लंघन करत आहेत. हे अॅप्स सार्वजनिक जुगार कायदा, १८६७, बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० यासंह अनेक कायद्यानुसार बेकायदा आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

तरुण आहारी गेला आहे तरुण वर्ग या अॅप्सच्या आहारी गेला आहे. अॅप्स वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काहींनी आत्महत्या केली आहे. तरुण आपले पैसे गमावत आहेत आणि आत्महत्या करत आहेत, असे ननावरे यांनी याचिकेत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.