देशात आणखी ५ नवे जिल्हे
गृहमंत्री अमित शह यांची मोठी घोषणा !
दिल्ली : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखच्या लोकांना फायदा होईल. लडाखच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठीच हा निर्णय घेत असल्याचे शहा म्हणाले.
गृह मंत्रालयाने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या जिल्ह्यांमध्ये झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे. हे नवीन जिल्हे प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
2019 मध्ये लडाखला जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे करण्यात आले आणि तो एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला होता. त्यावेळी या केंद्रशासित प्रदेशात लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. आता लडाखमध्ये आणखी पाच नवीन जिल्हे (झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग) तयार करण्यात आले आहेत.
मध्ये लडाखचे कारगिल आणि लेह जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. 1989 मध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये दंगली झाल्या होत्या. 1990 च्या दशकातच, लडाखला काश्मिरी राजवटीतून मुक्त करण्यासाठी लडाख स्वायत्त हिल विकास परिषद स्थापन करण्यात आली आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी तो केंद्रशासित प्रदेश बनला. लडाख हा भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.