Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ



अहमदनगर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जागांचा फटका बसला. विधानसभेत मात्र ही झळ लागू नये म्हणून महायुतीनं कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार जनसन्मान यात्रा करत आहेत. याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज धुळे शहरात दाखल झाली आहे. धुळ्यात अजित पवारांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपासून सुरु झालेल्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ही यात्रा धुळ्यात दाखल झाली आहे. धुळ्यात कामगारांच्या मेळाव्यासह माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रचारासाठी सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे.

यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती 288 जागा पूर्ण ताकदीने लढणार असं प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते एकत्रितपणे राज्याच्या दौऱ्यावर निघतील असंही तटकरे म्हणाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.