Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महापुराबाबत अफवावर विश्वास न ठेवता सहकार्य करा कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आवाहन

महापुराबाबत अफवावर विश्वास न ठेवता सहकार्य करा
कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आवाहन



सांगली : खरा पंचनामा


सांगलीसह कोल्हापूर परिक्षेत्रातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. पूरस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासकीय यंत्रणासह पोलिस प्रशासनही तुमच्यासोबत आहे. अफवावर विश्वास न ठेवता सहकार्य करा, असे आवाहन कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.


सांगलीतील आयर्विन पुल, मगरमच्छ कॉलनी, वसंतदादा स्मारक परिसरातील पूरस्थितीचा महानिरीक्षक फुलारी यांनी आढावा घेतला. मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांनी त्यांनी संवाद साधत स्थितीची माहिती घेतली. एनडीआरएफच्या जवानांकडूनही फुलारी यांना माहिती घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महानिरीक्षक फुलारी म्हणाले, ‘‘कोल्हापूर परिक्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक नद्यांना पुर आला आहे. एनडीआरएफ, लष्करासह जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणा पुरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी काम करीत आहेत. नागरिकांनी यंत्रणांना सहकार्य करावे. सध्या पूरस्थिती नियंत्रणात असून पुराशी मुकाबला करण्यास पोलिस सक्षम आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तरुणांनी सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. पोलिसांच्या निर्देशाचे पालन करावे. पुरग्रस्त नागरिकांनीही घरी परतण्याची घाई करू नये. पावसाचा अंदाज घ्यावा.’’

यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. 

नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करा
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, ‘‘पोलिसांनी तीन महिन्यात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.  दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरोड्यात पाच जणांना अटक केली आहे. एकजण फरारी आहे. सामुहिक बलात्कार प्रकरणातही चार संशयित निष्पन्न झाले आहेत. सांगलीकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.’’

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.