Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीणचे, सुधाकर पठारे साताऱ्याचे अधीक्षक

राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीणचे, सुधाकर पठारे साताऱ्याचे अधीक्षक 



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने मंगळवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सोलापूरचे ग्रामीणचे अधीक्षक तर सुधाकर पठारे यांची साताऱ्याचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याच्या अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांची पुण्यातील राज्या राखीव बल १ कडे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे. 
 
पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांची हिंगोलीचे अधीक्षक म्हणून तर नागपूर शहरचे उपायुक्त अनुराग जैन यांची वर्ध्याचे पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. सीआयडी नागपूरचे अधीक्षक विश्व पानसरे यांची बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीचे अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची धाराशिवच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. 

गडचिरोलीचे अतिरिक्त अधीक्षक कुमार चिंता यांची यवतमाळच्या अधीक्षकपदी तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या नंदकुमार ठाकूर यांची पीटीसी दौंडच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदूरबारचे अतिरिक्त अधीक्षक निलेश तांबे यांची पीटीसी नागपूरच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळचे अधीक्षक पवन बनसोड यांची अमरावती सीआयडीचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. वधार्चे अधीक्षक नुरूल हसन यांची नवी मुंबई राखीव बल ११ चे समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. एसीबी पुणेचे अधीक्षक अमोल तांबे यांची दक्षता अधिकारी पुणे महानगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या मनिष कलवानिया यांची मुंबई शहरचे उपायुक्त तर अपर्णा गिते यांची कायर्कारी संचालक महावितरण पदावर बदली करण्यात आली आहे. 

प्रियांका नारनवरे यांची नागपूर लोहमार्गच्या अधीक्षक पदावर केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर दिगंबर प्रधान यांची एसीबी नागपूरच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रधान यांची मुंबई शहरचे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.