कोल्हापूर परिक्षेत्रातील ४६ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आदेश
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर परिक्षेत्रातील ४६ पोलिस उपनिरीक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये ९ अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगलीतील एकाची बदली झाली असून दोघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर चार अधिकारी नव्याने सांगलीत येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील ६ उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून सातारा जिल्ह्यात १२ उपनिरीक्षक नव्याने येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ८ जणांची बदली झाली असून ७ अधिकारी नव्याने येणार आहेत. सोलापूर ग्रामीणमधील ६ जणांची बदली झाली असून ६ जण नव्याने येणार आहेत. पुणे ग्रामीणमधील १२ अधिकाऱ्यांची बदली झाली असून १२ अधिकारी नव्याने येणार आहेत.
पुणे ग्रामीणकडील माधवी देशमुख यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. सांगलीतील जगन्नाथ चव्हाण, राजू अन्नछत्रे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कोल्हापुरातील नरेंद्र पाटील, साताऱ्यातील दिपजोती पाटील, भैरीनाथ कांबळे यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. सांगलीतील उपनिरीक्षक उदय पोतदार यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.