Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत वेगळीच आग आहे, याना दाखवा एकदा मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

सांगलीत वेगळीच आग आहे, याना दाखवा एकदा
मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन



सांगली : खरा पंचनामा

"आपण क्षत्रिय मराठे आहोत. मैदानात उतरलो की मागे नाही. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. आपल्या रॅली ला जाऊ नका कोण आमदार मंत्री म्हणत असेल तर मला सांगा. मी त्याचा कार्यक्रमच लावतो. सांगलीत वेगळीच आग आहे. याना दाखवा एकदा. एकदा आरक्षण मिळू द्या. मग तुम्ही कुठल्या पक्षात जायचा ते जा. सगळ्या जाती धर्मां ना वाटले आपण पण एक झाले पाहिजे," असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज गुरुवारी सांगली येथे केले.


जरांगे म्हणाले, "सांगली नगरीतून सरकारला आव्हान करतो. सांगली, कोल्हापूरला पुराने थैमान घातले आहे. यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्या. अलमट्टीचा धरण एकदा त्याच्याकडे बघूया.  हे आंदोलन संपले की बघू त्याच्याकडे. त्याच मोजमाप करायचं आहे."

"आता मुंबई ला गेलो तर त्यांना मुंबई मधून बाहेर यावं लागेल. आपली शक्ती आपल्यात वापरू नका. हात जोडून सांगतो.  आता सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची राहिले आहे. ती फक्त मिळवायची आहे"

"देवेंद्र फडणवीस म्हणाले होते धनगर समाजाला सत्ता आली की आरक्षण देऊ. पण अजून त्याची कॅबिनेट होईना आणि आरक्षण मिळेना. आपल्या समाजाची अस्मिता टिकवून ठेवणे गरजेच आहे. दुसऱ्याचा आमदार आणि नोकरदार करणार आहोत का? आपल का नाही? 13 तारखे पर्यंत आमच्या मागण्या मान्य करा. सरकारला विनंती आहे पुन्हा, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.