Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुख्यात गुंड निलेश घायवळ अन् भाजप आमदार राम शिंदे एकत्र देवदर्शनाला

कुख्यात गुंड निलेश घायवळ अन् भाजप आमदार राम शिंदे एकत्र देवदर्शनाला



अहमदनगर : खरा पंचनामा

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट केला होता.

यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय. नागपंचमी निमित्ताने जामखेडच्या नागेश्वराची यात्रा असते. या यात्रेत गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे एकत्रित दिसून येत आहेत. निलेश घायवळवर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.