Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा"

"कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा"



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींपेक्षा कितीही रक्कम लागू दे सरकार द्यायला तयार आहे. मात्र केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बनवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदादा यांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली.

नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच भेट दिली होती. यावेळी अजितदादा पवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत याच्याकडून घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेतली. शिवाय नाट्यगृहाची पुनर्बाधणी करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्या सूचना केल्या. कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये, नाट्यगृह जसं पूर्वी होतं तशाच पद्धतीने बनवा. त्यासाठी सरकार वाटेल ती मदत करायला तयार असल्याचे अजितदादा म्हणाले. वास्तू पुन्हा उभी करत असताना नेमकी कशी काळजी घ्यावी हे देखील सांगितले. त्याचबरोबर शाहु खासबाग मैदानाची पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. जुन्या वास्तूवर अशा प्रकारे गवत वाढू देवु नका अशा सूचनाही दिल्या. 

दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.