Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीटबेल्ट न घालणाऱ्यांना ट्रॅफिक पोलिसांनी बांधली 'सुरक्षेची राखी'!

सीटबेल्ट न घालणाऱ्यांना ट्रॅफिक पोलिसांनी बांधली 'सुरक्षेची राखी'!



पुणे : खरा पंचनामा

रक्षाबंधन या सणाला रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं. आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खास मानला जातो. बहिणीच्या रक्षणाचे वचन देत भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो.

याच सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणार यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढत असताना ट्रॅफिक पोलिसांनी राखी पौर्णिमेचा निमित्त सादर एक अनोखा उपक्रम सुरू केला.

रक्षाबंधन सणाला भाऊ आपल्या बहिणीला संरक्षणाचे वचन देतो आणि बहीण भावाला राखी बांधते. याच सांस्कृतिक परंपरेशी सीट बेल्ट न घालणाऱ्यांसाठी जनजागृतीची सांगड घालत पुणे ट्रॅफिक पोलिसांनी भावांना सुरक्षेची राखी बांधलीये. सध्या शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढली असून नियमांचे वारंवार उल्लंघन होताना दिसतं. यासाठी पुणे ट्रॅफिक पोलिसांनी रक्षाबंधनाचे निमित्त साधत अनोखी शक्कल लढवली आहे.

पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न घालणाऱ्यांना दरडवण्याऐवजी आता सुरक्षेची राखीच बांधली आहे. शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तसेच पोर्से कार अपघातासारख्या घटना होऊ नयेत यासाठी पुणे ट्रॅफिक महिला पोलिसांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय. एरवी नियम मोडला की पावती फाडणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलीस आज चक्क सीटबेल्टचा महत्त्व समजावून सांगत सीटबेल्ट सारखी दिसणारी राखी घालून सुरक्षेची राखी बांधताना दिसतायत. विशेष म्हणजे सीट बेल्ट सारखी दिसणारी राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून आयुष्यभर सीट बेल्ट घालून प्रवास करेन असं वचन सुद्धा त्या भाऊरायाकडून घेतायत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.