राज्य फेडरेशनच्या दीपस्तंभ २०२४ पुरस्काराने कर्मवीर पतसंस्था सन्मानित
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पुणे विभागातून एक हजार कोटींवरील ठेवी गटातून प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ २०२४ पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेला मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, हा पुरस्कार देताना संस्थेचे अर्थकारण, संस्थेच्या वापरातील तंत्रज्ञान, समाजकारण, ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा, संस्थेची आर्थिक प्रगती, व्यवस्थापन, सहकारातील योगदान या मापदंडावर आधारित संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीने छाननी केल्यानंतर प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली होती, असेही पाटील यांनी सांगितले.
संस्थेच्या ठेवी ११२० कोटी रुपयांच्या असून ८२३ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेची गुंतवणूक ४०१ कोटी रूपयांची आहे. संस्थेचे भागभांडवल ३७ कोटी असून सभासद संख्या ६५ हजार २०० आहे. आतापर्यंत संस्थेला १८ पुरस्कार मिळाले आहेत, असेही रावसाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे, संचालक एड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, संचालिका भारती चोपडे, डॉ. नरेंद्र खाडे, लालासो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.