राज्य उत्पादन शुल्ककडील ५५ निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील ५५ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगलीत दोन अधिकारी नव्याने दाखल होणार आहेत तर एकाची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे.
कराडचे निरीक्षक एस. एस. साळवे यांची पनवेलच्या भरारी पथकाकडे तर सोलापूरचे अशोक कटकम यांची बदली सांगलीकडे करण्यात आली आहे. कुडित्रे येथील समीर पाटील यांची करवीरकडे तर सांगलीतील राजेश भापकर यांची बदली साताऱ्याला करण्यात आली आहे. साताऱ्याचे राजेश कोळी यांची वाई-महाबळेश्वरकडे तर रत्नागिरीचे प्रभात सावंत यांची बदली सांगलीतील जत विभागात करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.